Hot Posts

6/recent/ticker-posts

मान्सून अजून दूरच; पण मुंबई आणि पुण्यातील हवामानाबाबत imd कडून अलर्ट

मान्सून अजून दूरच; पण मुंबई आणि पुण्यातील हवामानाबाबत imd कडून अलर्ट

            मुंबई (कटूसत्य वृत्त):-केरळात मान्सूनला सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यात ही मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

            दरम्यान सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.  तसेच पुणे, मुंबई या भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याने उष्णतेची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

            राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. 03) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान कोल्हापूर आपत्ता व्यवस्थापन विभागाकडूनही काही सूचना करण्यात आल्या आहेत.

            मागच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उष्णतेची लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान 40 पार पोहोचले आहे. तर पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मध्य महाराष्ट्रात तापमान 37 अंशांच्या खाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पुणे, मुंबई या भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याने उष्णतेची शक्यता आहे.

            मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली नगर जिल्ह्यातील अकोला येथे 50 मिलिमीटर, श्रीरामपूर येथे 20 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मराठवाड्यातील लातूरच्या उदगीर, औसा, परभणीतील घालेगाव, बांड मधील अंबाजोगाई येथे प्रत्येकी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आज (ता. 3) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

            दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये राज्यात पुणे 34.6, नगर 35.1. धुळे 40.5, जळगाव 41.2. कोल्हापूर 34.2. महाबळेश्वर 24.6, नाशिक 36.2. निफाड 36.8, सांगली 35.8, सातारा 33.8, सोलापूर 37.2, सांताक्रूझ 34, डहाणू 34.2, रत्नागिरी 33.2, औरंगाबाद 39, परभणी 40.7, नांदेड 40.8, अकोला 43.7. अमरावती 40.2. बुलडाणा 39.5, ब्रह्मपुरी 45.2, चंद्रपूर 44.8, गोंदिया 44.8 नागपूर 43.8, वर्धा 44 तापमानाची नोंद झाली.

            कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचून राहिले.विजांचा कडकडाट आणि गारांसह काही भागात पाऊस झाला.मान्सून पूर्व मशागतीची जी कामे होती त्या कामांना या पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

Reactions

Post a Comment

0 Comments