निवृत्ती कदम सेवानिवृत्त... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

निवृत्ती कदम सेवानिवृत्त...

निवृत्ती कदम सेवानिवृत्त...

             बेंबळे (कटुसत्य वृत्त): येथील निवृत्ती गोवर्धन कदम हे 39 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत,ते मेजर नावाने सर्वत्र ओळखले जातात. माळशिरस तालुक्यातील चाकोरे हे निवृत्ती कदम यांचे मुळगाव. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते सैन्यात भरती झाले व अल्पावधीतच सैन्यातील अवजड वाहनांचे ड्रायव्हर म्हणून त्यांची नेमणूक झाली. दारुगोळा व वरिष्ठ सैनिक अधिकारी व इतर महत्त्वाचे साहित्य वाहतूक करून पोहोचवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असे. त्यांनी बेळगाव ,चितोडगड ,उत्तरांचल, कारगील, द्रास, लेह ,आसाम, अंदमान-निकोबार, बबीना, झाशी आदी महत्त्वाच्या ठिकाणी सेवा केली व अठरा वर्षानंतर ते सैन्यातुन निवृत्त झाले व बेंबळे येथे स्थायिक झाले. त्यांच्या सैन्यातील सेवेची दखल घेऊन आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर त्यांची सुरक्षा सुपरवायझर पदावर नेमणूक केली, या कारखान्यात त्यांनी सोळा वर्षाची सेवा केलीव येथून निवृत्त झाल्यानंतर मॅक्स कंपनी तर्फे टेंभुर्णी येथील महापारेषण मध्ये पाच वर्ष सेवा केली आहे, व अशा प्रकारे एकूण 39 वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या पासष्टाव्या वर्षी ते आता निवृत्त झाले आहेत. आयुष्यात या संपूर्ण काळामध्ये सहधर्मचारीणी सौ. संजीवनीचा मोलाचा सहभाग असल्याचा ते आवर्जून उल्लेख करतात .चि.जीवन व चि.उमेश ही त्यांची दोन्ही मुले इंजिनिअर असून पुणे येथे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत आहेत निर्व्यसनी वृत्ती प्रामाणिक शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे मेजर कदम हे सर्वत्र आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे . त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची आवड असून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अध्यात्मिक ज्ञानामध्ये ते सक्रीय कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages