छत्रपती शिवाजी संकुलात बारावी गुणवंताचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

छत्रपती शिवाजी संकुलात बारावी गुणवंताचा सत्कार

छत्रपती शिवाजी संकुलात बारावी गुणवंताचा सत्कार

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील मराठा समाजसेवा मंडळ, सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलातील विविध शाखांमधील बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये छत्रपती शिवाजी नाईट व डे कनिष्ठ महाविद्यालय तसेच व्यवसाय अभ्यासक्रम मराठा मंदिर आणि विडी घरकुल येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील अठरा गुणवंताचा समावेश होता.विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थी असे :-

                दिनेश गायकवाड, प्रतिक्षा जाधव, चैतन्य आसबे, संकेत शेंडगे, शुभांगी कंटाळे, तुषार रणदिवे, संगिता चव्हाण, रेवती जाधव, विनायक वालेकर,गौरव कोळी, प्रतिभा चौगुले, गॅलिलिओ माटला, सानिया मुजावर, सबा खान, श्रृती गायवाड, प्रियांका सोनसळे, सानिया नदाफ, रूपाली भालेराव, यल्लप्पा म्हंता. यावेळी संस्थाध्यक्ष सपाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना "जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले"या कार्यक्रमास विनायक पाटील, सरचिटणीस प्रा. महेश माने,प्राचार्य राजेंद्र शिंदे, उदयसिंह पवार, मनोज पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन शंभूदेव गावडे यांनी केले तर प्राचार्या सुजाता जुगदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages