पंढरपूरत २५ हजार रुपये किमतीची ५०० लीटर हातभट्टी दारू असा ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

पंढरपूरत २५ हजार रुपये किमतीची ५०० लीटर हातभट्टी दारू असा ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूरत २५ हजार रुपये किमतीची ५०० लीटर हातभट्टी दारू असा ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  वडजी तांडा (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथून पंढरपूरकडे घेऊन येणारे वाहन राज्य उत्पादन विभागाने कारवाईत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पकडले आहे.या कारवाईत दारू वाहतूक करणारे ४ लाख ५० हजार रुपयांचे एक वाहन व २५ हजार रुपये किमतीची ५०० लीटर हातभट्टी दारू असा ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दक्षिण सोलापूरहून पंढरपूरमध्ये हातभट्टी दारू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती राज्य शुल्क उत्पादन विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पंढरपूर शहरातील सरगम चौकात सापळा रचला. यावेळी एम. एच. ४५ ए८० या क्रमांकाच्या संशयित वाहनास थांबवले असता त्या वाहनात अंदाजे ५०० लीटर हातभट्टी दारू आढळून आली. या प्रकरणी रमेश गोपीचंद राठोड (रा. बोरडेगाव, ता.दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक एन.के.धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.ए.मुळे,सहानि.जे.डी.मुंढे.गणेश रोडे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages