डीएचबी सोनी महाविद्यालयाचे बारावी सायन्स व कॉमर्स परीक्षेत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

डीएचबी सोनी महाविद्यालयाचे बारावी सायन्स व कॉमर्स परीक्षेत यश

डीएचबी सोनी महाविद्यालयाचे बारावी सायन्स व कॉमर्स परीक्षेत यश

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेचा निकाल दि. ८ जून २०२२ रोजी मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सतत सातव्या वर्षी १००% लागला आहे. उज्वल यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी मारली. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम राखून नेत्रदिपक यश संपादन केले.महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा एकूण निकाल १०० टक्के लागला. यामध्ये, विज्ञान शाखेतील अनुक्रमे ५

विद्यार्थी खालीलप्रमाणे :-

■ कामतकर स्वर अभय ( ९३.१७% )-प्रथम क्रमांक

■ शिंदे अश्विन अविनाश (९०.६७%)-व्दितीय क्रमांक

■ सिंदगी शुभम अनिल ( ८७.५०% )-तृतीय क्रमांक

■ कळसगोंडा श्रृती संजय (८६.५०%)-चौथा क्रमांक

■ शेळके रुग्वेदा राहुल ( ८६.१७% )-पाचवा क्रमांक

              सायन्स शाखेतून ८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४९.४०% विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण इाले तर ४९.४०% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्वर कामतकर या विद्यार्थ्यांस फिजिक्स या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले इलेक्ट्रॉनिक्स या विषयात २०० पैकी १९२ गुण प्राप्त केले.

              सोलापूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेचा निकाल दि. ८ जून २०२२ रोजी मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सतत सातव्या वर्षी १००% लागला आहे. उज्वल यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी मारली. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम राखून नेत्रदिपक यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १०० टक्के लागला. यामध्ये, वाणिज्य शाखेतील अनुक्रमे ५ विद्यार्थी खालीलप्रमाणे,

■ कारिगर झारा अफताब (९७%)- प्रथम क्रमांक -जिल्यात पहिला

■साळुंखे शुभम गणेश (९३.८३%)-व्दितीय क्रमांक

■हिदुगी जान्हवी गिरीश ( ९३.८३%)-व्दितीय क्रमांक

■पुजारी आदित्य महादेव (९२.१७%)-तृतीय क्रमांक

■ दोडमणी वरुण रमेश (९०.१७% )-चौथा क्रमांक

■ भांबुरे आर्या प्रितम (९०% )-पाचवा क्रमांक

              वाणिज्य शाखेतून १२३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४६.३४% विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर ४५.५३% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कारिगर झारा व साळुंखे शुभम या विद्यार्थ्यांनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले तर कारिगर झारा या विद्यार्थिनीने अकौंटन्सी या विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष  लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव  आनंदजी भंडारी, सह-सचिव  मधुसुदनजी करवा तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्य प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या  हरदीप बोमरा, शिक्षक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages