विठ्ठल च्या निवडणुकीसाठी अभिजीत पाटलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करित अर्ज दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

विठ्ठल च्या निवडणुकीसाठी अभिजीत पाटलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करित अर्ज दाखल

विठ्ठल च्या निवडणुकीसाठी अभिजीत पाटलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करित अर्ज दाखल


               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विठ्ठल सहकारी साखर कारखाना  निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता यासाठी अभिजीत पाटील यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शन द्वारे आपला अर्ज दाखल केला ही निवडणूक पंढरपूर शहर व तालुक्यात साठी अस्मितेचा प्रश्न आहे  शेतकरी कामगार व्यापारी सभासद वर्ग मोठ्या संख्येने शिवतीर्थावर तुफान गर्दी करून होता कै औदुंबर आन्ना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिजीत पाटील हे पंढरपुरात दाखल झाले त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विठ्ठल नामाच्या गजरात तसेच बैलगाडी मध्ये बसून अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ वरून प्रस्थान केले.

               यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना उघडउघड आव्हान दिले कारखाना सुरळीत चालण्यासाठी जे काही मला करता येईल ते मी  करणार सभासद शेतकरी वर्ग शेतकरी कामगार वर्ग व्यापारी यांच्या हितासाठी कटिबद्ध असणार अशी त्यांनी सांगितले  आपल्या भाषणात त्यांनी कारखाना कसा चालवायचा असतो त्याचं  उदाहरण दिलेआणि सभासदांना दिला विश्वास सभासद वर्गांना त्यांनी आत्मविश्वासाने माझ्या पाठीशी उभे राहावे असे जाहीर आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages