सोलापूरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

सोलापूरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

सोलापूरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर पोलिस आयुक्त म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारल्यानंतर सुधीर हिरेमठ यांनी मटका-जुगार, घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर, हातभट्टी दारू विक्री, रस्त्यालगत हातगाडे लावून वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांसह बेशिस्त दुचाकी चालकांवर कारवाया सुरु केल्या आहेत. शहरातील सातही पोलिस ठाण्याचे अधिकारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे शहरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे. दोन दिवसांत त्यांनी ५० पेक्षा अधिक कारवाया करून अनेकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages