एक परिवार एक वृक्ष योजनेचा सोलापुरात शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 11, 2022

एक परिवार एक वृक्ष योजनेचा सोलापुरात शुभारंभ

एक परिवार एक वृक्ष योजनेचा सोलापुरात शुभारंभ

नवेपर्व प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक पर्यावरण दिन व स्वातंत्र्याचा 75 वा  अमृतमहोत्सवानिमित्त नवेपर्व प्रतिष्ठानच्यावतीने एक परिवार एक वृक्ष या योजनेचा शुभारंभ महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते करण्यात आला.

              या योजनेमध्ये सोलापूर शहरातील नागरिकांनी आपल्या घरासमोर किंवा मोकळ्या जागेत वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले पर्यावरण दिन व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त संस्थेच्यावतीने 75 वृक्ष लावून संगोपन करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद  महाले यांनी सांगितले.

              यावेळी महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव विकास कस्तुरे चंद्रकांत मुळे  शशिकांत वाघमारे राघवेंद्र अलकुंटे सहसचिव संदीप अकुडे सागर गायकवाड नागेश क्षिरसागर सिद्धाराम मेणगुडले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages