जुजारपूर येथील शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक जबर धक्का - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

जुजारपूर येथील शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक जबर धक्का

जुजारपूर येथील शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक जबर धक्का 

तरुणांचा शेकापला जय महाराष्ट्र राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

                सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोळा जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या जुजारपूर ता. सांगोला येथे गतवर्षी शेतकरी कामगार पक्षाला लागोपाठ हादरे देत असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती करत रविवार दि ५ जून रोजी आणखी काही तरुणांनी शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा ता. सांगोला येथे संकेत ढेरे आणि रितेश गाडे या तरुण नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल खटकाळे, जुजरपुर गावचे उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ओ.बी.सी. सेलचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते विजय बजबळे, घेरडीचे सरपंच दिलीप मोटे, पारे गावचे मा.सरपंच संतोष पाटील, नितीन गाडे, हनुमंत हिप्परकर, विकास बजबळे आदींसह जुजारपूर गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

                यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तरुणांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले व आगामी काळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी पायाला भिंगरी लावून आपला वार्ड, आपले गाव, पंचायत समिती गण, आणि जिल्हा परिषद गटात पर्यायाने संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी परिवारचा एक अविभाज्य घटक असतो. कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात कधीही अडचण आली तर, निसंकोचपणे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा निश्चितपणे आपण अर्ध्या रात्रीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वासही शेवटी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तरुणांना दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages