इटकी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी कामगार पक्षावर एकतर्फी विजय..!

राष्ट्रवादीचे कृष्णदेव सावंत तब्बल १४२ मतांनी विजयी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण महूद जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागून राहिलेल्या इटकी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णदेव पांडुरंग सावंत यांनी प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत पोट निवडणुकीत तब्बल १४२ मतांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारसह सर्व कार्यकर्त्यांनी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन समोर गुलालाची मुक्त उधळण करत हलगीच्या तालावर ठेका धरून आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी विजयी उमेदवार कृष्णदेव सावंत यांचा सोमवार दि. ६ जून रोजी राष्ट्रवादी भवन येथे सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाजी कर्चे, आकाश सावंत, नितीन सावंत, जगन्नाथ गळवे, बाळासाहेब सावंत, हिम्मतराव पवार, अशोक चव्हाण, शिवाजी शिरकांडे, बाबुराव कर्चे, धनाजी सावंत, धनाजी पाटील, अक्षय सावंत, हरिदास डोंगरे व पिंटू कर्चे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment