नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकपदी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 4, 2022

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकपदी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती..!

 नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकपदी आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती..!

संघटनेतील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिपकआबांवर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी

               सांगोला (कटुसत्य वृत्त): देशाचे केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावंत नेते अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. गुरुवार दिनांक २ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशअध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रभारी ना. जितेंद्र आव्हाड व पक्षाचे सचिव शिवाजीराव गर्जे यांनी नियुक्तीपत्र देवून आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबईच्या निरीक्षकपदी निवड केली.

               आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य पदावर अत्यंत प्रभावीपने काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊनच गेल्या ३ वर्षांपूर्वी पक्षाने त्यांना राज्याचे उपाध्यक्ष पद दिले होते. आपल्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे तसेच पक्षात संघटनात्मक कामावर भर दिल्याने आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन संघटनात्मक कामाचा प्रचंड अनुभव आणि आवड असलेल्या आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. नवी मुंबई परिसरात उद्योग व्यवसाय, उदरनिर्वाह आणि रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक वर्षानुवर्षे राहत आहेत. या नागरिकांची आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे संबंध दृढ आहेत. त्यांनी आजवर संघटनेत केलेले प्रभावी काम आणि नागरिकांशी असलेले संबंध व संपर्क याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चित फायदा होणार आहे. 

               2009 रोजी झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दस्तुरखुद्द देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रचार प्रमुखाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली होती. तसेच गतवर्षी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा व नेत्यांचा समन्वय साधून जिल्ह्यातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. संघटनेतील प्रत्येक जबाबदारी अत्यंत चोख आणि प्रभावीपणे पार पाडनाऱ्या आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपली सांगोला विधानसभा तसेच संपूर्ण जिल्ह्यात असलेली त्यांची असलेली निर्णायक ताकद वारंवार सिद्ध करून दाखवली आहे. पक्षाने त्यांची संघटनेत काम करण्याची पद्धत आणि अनुभव पाहूनच अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या परिसरात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी दिपकआबांवर ही मोठी जबाबदारी टाकली आहे.

               दरम्यान नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षकपदी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती झाल्याने या परिसरातील नागरिक तसेच प्रामुख्याने तरुणांत प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

पदाला न्याय देवून विश्वास सार्थ ठरवणार..!

               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, खा. सुप्रियाताई सुळे, पक्षाचे प्रभारी जितेंद्र आव्हाड साहेब यांनी ज्या विश्वासाने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदावर आपली नियुक्ती केली आहे त्या पदाला निश्चित न्याय मिळवून देऊ. तसेच पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेब, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अशोकराव गावडे, मा.खा. आनंदराव परांजपे, नेते प्रशांत पाटील, नामदेव भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उद्योगपती बाळासाहेब देशमुख  यांच्यासह नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वार्डनिहाय संघटनात्मक कामावर भर देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार घरोघरी पोहोचविण्यावर भर देणार. - आम.दिपकआबा साळुंखे पाटील (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नूतन निरीक्षक, नवी मुंबई)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages