आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने 'कैलास रथ' लवकरच !

यथाशक्ती देणगी देऊन सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
सांगोला (कटुसत्य वृत्त):- सांगोला शहरात मृत्यू पावलेल्या व्यक्तीला स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान सांगोलाच्या वतीने "कैलास रथ" (४ चाकी वाहन ) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सांगोला शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी स्वेच्छेने देणगी देऊन या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सांगोला शहरात एकच स्मशानभूमी असल्यामुळे शहरातील विस्तारित भागातील नागरिकांच्या सोयीसाठी हा "कैलास रथ" उपयोगी पडणार आहे. एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या अंत्यविधिसाठी स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी वाहनाची सुविधा आजपर्यंत उपलब्ध नव्हती. शहरात एखतपूर रोड, चिंचोली रोड, वासूद रोड, मिरज रोड, पंढरपूर रोड, महूद रोड, कडलास रोड आदी भागात राहणाऱ्या एखाद्याचा मृत्यू झाला तर स्मशानभूमी पर्यंतचे अंतर जास्त असल्याने अंत्ययात्रेसाठी त्रास सहन करावा लागतो, याची दखल आपुलकी प्रतिष्ठानने घेऊन लवकरच अत्यल्प दरात "कैलास रथ" उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी स्वेच्छेने देणगी जमा करण्यात येत आहे. शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी आपली देणगी प्रतिष्ठानच्या बँक खात्यावर अथवा रोखीने देऊन संस्थेची अधिकृत पावती घेऊन या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आपुलकीच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली देणगी आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला च्या समर्थ सहकारी बँक, शाखा सांगोलाच्या खात्यावर - खाते क्र.- 0220051010000328 आय एफ एस सी कोड- SBLS0000001 अन्वये जमा करावी.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष- राजेंद्र यादव (9423969644), सचिव- संतोष महिमकर, (9922883264), अरविंद केदार (9270687900), गोपाल चोथे ( 9420359494) यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments