Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट-२२ परीक्षेत घवघवीत यश

सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट-२२ परीक्षेत घवघवीत यश 

              सांगोला, (कटुसत्य वृत्त): जीपॅट-२०२२ या फार्मसी पद्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.राष्ट्रीय स्थरावरील या परीक्षेसाठी सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश प्राप्त केले. चतुर्थ बी.फार्मसी वर्षाच्या विद्यार्थिनी  कु.अश्विनी शिवाजी कांबळे, कु.धनश्री मधुकर ननवरे तसेच कु.मोनाली राजाराम सरगर या विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या.जीपॅट-२२ हि केंद्रीय स्वरूपाची परीक्षा एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतात जिल्ह्याच्या ठिकाणी झाली.या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवतेच्या आधारे औषधनिर्माणशास्त्र पद्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.तसेच महत्वाचे म्हणजे या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पद्युत्तर शिक्षणासाठी भरघोस शिष्यवृत्ती दिली जाते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछया दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालय जीपॅट विभाग प्रमुख प्रा.श्री.एस.एस.काळे, डॉ.एन.ए.तांबोळी,प्रा.एस.एम.माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments