अकलूजच्या कॉलेज अॉफ फार्मसीच्या विद्यार्थींचे जी पॅट परीक्षेत यश
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील घेतल्या जाणाऱ्या व एम.फार्मसी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या एप्रिल 2022 मध्ये घेतलेल्या जी पॅट २०२२ परीक्षेत उज्वल यश मिळवले.या महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वर्षाराणी शिवाजी जाधव,राकेश रमेश अरकाल,सुदर्शन सुरेश शिंदे,रणजीत शशिकांत मिसाळ,ऐश्वर्या चंद्रकांत कर्चे,स्वप्निल पांडुरंग लोखंडे व प्रतिक विनायक रणवरे या सात विद्यार्थीनी या परिक्षेत यश संपादन केले आहे.राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये यश संपादित केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विनोदकुमार माणिकलाल दोशी,सर्व संचालक मंडळ,सचिव अभिजित रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अनिल सुभाष भानवसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments