चार हजाराची लाच घेताना तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडले
.png)
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंब या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यातील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र.५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे.सदर शेतजमीनीपैकी ४० आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सात बारा उताऱ्यावर पीक पाण्याची नोंद घेण्याकामी मौजे मोडनिंबचे गावकामगार तलाठी महेशकुमार राऊत यांनी तक्रारदारांच्याकडे ४००० रुपये लाचेची मागणी करून तो स्वतःस्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.मोडनिंब सजाचे महेशकुमार मनोहर राऊत (रा.मेडशिंगी, ता. सांगोला) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.यातील संशयित आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम टेंभुर्णी पोलीस स्टेशनला सुरू आहे. यामुळे महसूल खात्यामध्ये खळबळ उडाली आहे.
0 Comments