साेलापुरात जिल्ह्यातील शाळा न्यायाधीकरण बंद - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा आदेश अहमदनगर, उस्मानाबाद अाणि साेलापूर या तीन जिल्ह्यांसाठी साेलापुरात असलेले शाळा न्यायाधीकरण बंद करण्याच्या निर्णयाला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली. २० मे च्या निर्णयास अामदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याने १५ दिवसांत स्थगिती मिळाली.राज्यभर शाळा न्यायाधीकरणांची पुनर्रचना करताना साेलापूरचे न्यायाधीकरण बंद करण्याचा निर्णय झाला हाेता. साेलापुरात १९९७ मध्ये सुरू झालेल्या या न्यायाधीकरणाच्या कक्षेत लातूर जिल्ह्याचाही समावेश हाेता. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याला स्वतंत्र करत नांदेडला जाेडून घेतले होते. नव्या पुनर्रचनेत लातूरचे हे न्यायाधीकरण पूर्ववत ठेवून साेलापूरचे बंद करण्याचा निर्णय झाला. त्याला येथील शिक्षक अन् वकील संघटनांनी तीव्र विराेध केला. शिक्षणमंत्री परदेश दाैऱ्यावर असल्याने त्यावर निर्णय झाला नव्हता.
0 Comments