Hot Posts

6/recent/ticker-posts

माऊली महाविद्यालयाने मुलींसाठी वसतिगृह बांधून चांगले काम केले

माऊली महाविद्यालयाने मुलींसाठी वसतिगृह बांधून चांगले काम केले

           उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजामध्ये दुर्बल घटकाकडे लक्ष देऊन माऊली महाविद्यालयाने मुलींसाठी वसतिगृह बांधून चांगले काम केले आहे. कॉलेजचे विद्यापीठाकडे चांगले प्रस्ताव ज्यावेळी येत होते त्यावेळी आम्हीही प्रोत्साहन दिले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ.मृणालिनी फडणवीस यांनी केले. वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयाने बांधलेल्या सौ. मीरा मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या . राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,आ.यशवंत माने, प्राचार्य गुरुशांत चिट्टे, सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, बाजार समिती संचालक जितेंद्र साठे तर अध्यक्षस्थानी मा.आमदार राजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे यांचा सेवानिवृत्ती निमित्त आ.यशवंत माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आ.राजन पाटील, आ.यशवंत माने, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी महापौर महेश कोठे यांनीही आपले मन व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments