करमाळा येथे पोलिस असल्याची बतावणी करून ६८ हजारांस गंडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

करमाळा येथे पोलिस असल्याची बतावणी करून ६८ हजारांस गंडा

करमाळा येथे पोलिस असल्याची बतावणी करून ६८ हजारांस गंडा

             करमाळा (कटूसत्य वृत्त):- पोलिस असल्याची बतावणी करत ४५ वर्षाच्या एकास दोन अनोळखी व्यक्तींनी फसवणूक करून सोन्याची चैन व घड्याळ असा मुद्देमाल नेला आहे. सदरचा प्रकार शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कृष्णाजी नगर परिसरातील कृष्णा हार्डवेअर शेजारी घडला आहे. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             अजिनाथ राऊत (वय ४५) चांदगुड गल्ली रा. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे. राऊत यांचा दुधाचा व्यवसाय असून रोज नेहमीप्रमाणे ते करमाळा शहरात दूध घालतात. शनिवारी ते दूध घालण्यासाठी करमाळ्यात पायी चालत आले होते. दूध घालून ते माघारी देवीचामाळ रस्त्याने जात असताना कृष्णाजी नगर येथे आल्यानंतर कृष्णा हार्डवेअर समोर दोन अनोळखी व्यक्ती उभारलेले दिसली.

             त्यांनी राऊत यांना रस्त्याच्या बाजूला बोलवले. “आम्ही पोलिस आहोत येथे चौकशी चालू आहे, तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा तसेच काही वस्तू असल्यास पटकन द्या’ असे म्हटले. त्यावेळी राऊत यांनी हातातील घड्याळ, गळ्यातील पिवळ्या रंगाची दीड तोळ्याची सोन्याची चेन असे त्या दोन व्यक्तींकडे रुमालात गुंडाळून ठेवल्या. तो रुमाल त्यांनी राऊत यांना परत दिला. पण काही वेळानंतर पाहिल्यानंतर त्या रुमालात घड्याळ व चैन नसल्याचे दिसून आले. त्यावेळी राऊत यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले यावेळी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेला होता. सदरचा घडलेला प्रकार राऊत यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर दोन अनोळखी विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages