करकंब, तुंगत गटातून भालके, काळे गटाकडे ४५ उमेदवार इच्छुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

करकंब, तुंगत गटातून भालके, काळे गटाकडे ४५ उमेदवार इच्छुक

करकंब, तुंगत गटातून भालके, काळे गटाकडे ४५ उमेदवार इच्छुक

               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करकंब आणि तुंगत या दोन गटातून ४५ इच्छुकांनी शनिवारी भालके - काळे यांच्या पॅनेलकडे उमेदवारी ची मागणी केली आहे. दरम्यान, बहुतांश कार्यकर्त्यांचा आघाडी न करता भालके - काळे यांनीच एकत्र लढावे असा सूर असल्याचेही शनिवारी दिसून आले.

               श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी भालके- काळे गटाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती आणि सभासद, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. शनिवारी करकंब आणि तुंगत या दोन्ही गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याण काळे, विठ्ठल चे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार संचालक महादेव देठे, विलास पासले आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडून दोन्ही गटातील परिस्थितीचा अंदाज घेतला. या दोन्ही गटात असलेल्या ३५ गावातील कार्यकर्त्यांना ही शनिवारी बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी गावनिहाय चर्चा केली गेली.

               उमेदवार कोण असावेत, निवडणुकीत कोणत्या गटासोबत आघाडी करावी की स्वतंत्र लढावे? सभासदांच्या मनात नेमके काय चालले आहे याची चाचपणी आज भालके आणि काळे यांनी केली.

               यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी कोणत्याही गटासोबत आघाडी न करता भालके आणि काळे यांनी स्वतंत्र लढावे अशी भावना व्यक्त केली. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जावी अशीही मागणी बहुतेक सर्व गावातील कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages