स्टीलसह मालट्रक चोरास 24 तासात पोलिसांनी घेतले ताब्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

स्टीलसह मालट्रक चोरास 24 तासात पोलिसांनी घेतले ताब्यात

स्टीलसह मालट्रक चोरास 24 तासात पोलिसांनी घेतले ताब्यात

                मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकाचे हात पाय बांधून ट्रक चालकाला उसाच्या फडात टाकून लोखंडी सळ्या घेऊन निघालेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना  कुर्डुवाडी - पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या आष्टी ता.मोहोळ शिवारातील माळी वस्ती येथे दि . ४  रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. बारा टन स्टीलसह चोरीस गेलेला ट्रक मोहोळ पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केला हस्तगत. एका संशयितास घेतले ताब्यात.

                पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हा घडल्यानंतर तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवून चोरीस गेलेल्या आयकॉन कंपनीचे स्टील घेवून जाणारा ट्रकचा शोध घेण्यासाठी मोहोळ पोलीस ठाणेकडील दोन तपास पथके तात्काळ ट्रक घेवून गेलेल्या दिशेने रवाना करून सदर ट्रकचा पंरडा , भूम , वाशी , तेरखेडा या ठिकाणी जावून कौशल्यपूर्ण तपास करून सदर ट्रकचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढली असता मौजे आष्टी ता . मोहोळ याठिकाणी ड्रायव्हरचे हात पाय बांधून त्यास शेजारील उसात टाकून दरोडा टाकून लुटलेले आयकॉन कंपनीचे स्टील व ट्रक हे मौजे येनेगाव तालुका पंरडा शिवारात असल्याची माहिती मिळताच जावून बारा टन आयकॉन कंपनीचे स्टील व एमएच १० झेड १३५२ ट्रक असे एकूण किमंत १३,१०,००० / रूपये असा  मुद्दे माला सह एक आरोपी ताब्यात घेऊन त्याला गजाआड करण्यात आले आहे.

                सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे,मोहोळ पोलिस स्टेशनच्या संयुक्त डीबी पथकातील सचिन माने, प्रवीण साठे,  सिद्धनाथ मोरे, शरद ढावरे, हरीभाऊ थोरात, पांडुरंग सायबर सेलचे युसूफ पठाण या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages