आम अॕड शहाजीबापू पाटील यांचे हस्ते चिकमहुद येथे बियाणेवाटप

सांगोला (कटूसत्य वृत्त):- दि१४ जून रोजी मौजे. चिकमहुद ता. सांगोला येथे मा. आमदार अॕड. शहाजीबापू पाटील यांचे हस्ते तालुका कृषी कार्यालया मार्फत मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
रा.अ.सु. अभियान पोष्टिक तृणधान्य सन २०२२-२३ पिक प्रात्यक्षिक- बाजरी बियाणे व कोव्हिड १९ मध्ये मयत व्यक्तींचे वारसदारास सोयाबीन मिनिकिट वाटप करण्यात आले व उपस्थित शेतकऱ्यांना खरिप अनुषंगाने तसेच वेगवेगळ्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच रविंद्र कदम,उपसरपंच कालिदास भोसले, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे ,मंडळ कृषि आधिकारी अमोल अभंग , कृषि पर्यवेक्षक जाधव , चव्हाण,कृषि सहाय्यक वाघमोडे ,सुरेशभाऊ कदम,बाळदादा सराटे,निवृत्ती बंडगर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment