सापटणे येथे तरुणाच्या अंगावर उकळते तेल टाकल्याने तरुणाचा मृत्यू

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, दोन्ही संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील सापटने टें येथील सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळच शेतात राहत असलेल्या तरुणाच्या अंगावर उकळते तेल टाकल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने या घटनेची खळबळ उडाली आहे.
सविस्तर टेंभुर्णी पोलिसांना मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री १ च्या सुमारास राहत्या घरी झोपलेल्या ढवळे याच्या अंगावर उकळते तेल संशयित पुतन्यानी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तेल टाकून खून केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील सापटणे (टें) या ठिकाणी घडली
सोमवारी रात्री मयत शहाजी गोविंद ढवळे (वय,५५. रा. सापटणे (टें) तालुका माढा) हे रात्री आपल्या घरी झोपले होते. रात्री एक वाजायच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांच्या घराच्या जवळील पिकास पाणी देण्यासाठी गेली होती. त्या वेळी घराचा दरवाजा उघडा होता. रात्री दीड वाजायच्या सुमारास मयत शहाजी ढवळे हे झोपलेल्या ठिकाणी त्यांच्या अंगावर संशयित वरील आरोपी यांनी उकळते तेल अंगावर टाकल्यामुळे त्यांनी लगेच उठून पाहिले तेव्हा त्यांना लाईटच्या उजेडात त्यांच्या भावकीतील संशयित आरोपी १)संतोष राजेंद्र ढवळे २) नरसिंह राजेंद्र ढवळे हे दोघेही रा. सापटणे (टें) तालुका माढा हे जाताना दिसले. अंगावर उकळते तेल टाकल्यामुळे शहाजी गोविंद ढवळे यांच्या तोंडावर, छातीवर, पोटावर, पायावर, मांडीवर उकळत्या तेलाने गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी टेंभुर्णी येथील जाधव हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही संशयित आरोपींना टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पो.ई. धनाजी ओमासे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment