विश्रांतवाडी पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरट्यास अटक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

विश्रांतवाडी पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

विश्रांतवाडी पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

एक लाख साठ हजार किंमतीच्या दुचाकी हस्तगत

              विश्रांतवाडी (कटुसत्य वृत्त): विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२२ भादविक ३७९ प्रमाणे दिनांक १५/०५/२०२२ रोजी चोरीचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील चोरीस गेलीली यामाहा आर एक्स १०० एम एच १२ झेड ३८३८ या गाडीचा व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी पो. अंमलदार प्रफुल मोरे आणि पो. अंमलदार संदिप देवकाते , पो. अंमलदार शेखर खराडे ,यांनी तांत्रीक बाबींचा तपास करून सीसी टिव्ही फुटेज प्राप्त केले फुटेज वरून पो. अंमलदार दिपक चव्हाण , पो. अं. शेखर खराडे त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करून सदर आरोपी हा गोकुळ नगर मैदान,धानोरी पुणे येथे गुन्ह्यातील मोटरसायकल सह सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह.चव्हाण ,पो. ह. किर्वे , पो. शि. देवकाते , पो.शि. खराडे ,यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी अमीर अजीज खान ( वय२० वर्षे) रा. गल्ली नं.१४ विमान बिल्डिंग जवळ मुंजाबा वस्ती धानोरी यांस अटक केली आरोपी कडे अधिक तपास केला असता त्यांनी आणखी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

              आरोपी कडून १५,००० हजार रुपये किंमतीची यामाहा आर एक्स १०० एम एच१२ झेड ३८३८ , ३०,००० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न एम एच १२ एच ई ९१५८ , पंधरा हजार किंमतीची होंडा कंमपनिची डिओ एम एच ०९ ई एस ८४३६ , एक लाख रुपये किंमतीची ( गुन्ह्यात वापरलेली बुलेट ) एम एच १२ आय यु ५३६३ एकुण एक लाख साठ हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

              सदरची कारवाई मा.नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.रोहिदास पवार ,पोलीस उप-उपायुक्त परिमंडळ ४, आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर , मा. विजयकुमार शिंदे ,यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

              सदरची उल्लेखनीय कामगिरी हि तपास पथक पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते , पोलीस कर्मचारी पो. ह. दिपक चव्हाण , पो. ह. यंशवंत किर्वे , पो. शिपाई संदिप देवकाते , प्रफुल मोरे , शेखर खराडे ,यांनी केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages