महाडिक यांच्या विजयाने भीमा कारखान्यावर जल्लोष
.png)
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भीमा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी खासदार कीची विजयश्री खेचून आणतात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. सकाळी नऊ वाजल्या पासून पुळुज, टाकळी सिकंदर, पापरी, पेनुर, खंडाळी, पाटकुल, कुरुल परिसरातील कार्यकर्ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. भिमराव(दादा) महाडिक यांच्या पुतळ्या जवळ जमा झाले. त्या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुतळ्या पासून टाकळी चौकापर्यंत घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कामगार सहभागी झाले होते. नुतन खा. धनंजय महाडिक यांनी अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्या बद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, विनोद महाडिक, पांडुरंग ताटे, बंडू शेख, जाकीर मुलाणी, राजू बाबर, विश्वास पांढरे, शिवाजी गुंड, भारत पाटील, संग्राम चव्हाण,पृथ्वीराज भोसले, हुसेन मुजावर, राम चव्हाण, अनिकेत गवळी, मुबिना मुलानी, आदीसह मिरवणूकीत हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.
No comments:
Post a Comment