जनहितच्या मागनीने ग्रामीण भागीतील एसट्या होणार पूर्ववत
.png)
घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील पाटकुल,देवडी,वाफळे,खंडाळी,पापरी,बोपले, वैराग,फुलचिंचोली,विरवडे मुक्कामी असणाऱ्या विविध मार्गावरच्या एसटी त्वरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गाड्या पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर(भैय्या)देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मार्गग परिवहन मंडळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती या मागणीची दखल घेत शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मार्गावरच्या मुक्कामी एस टी पूर्ववत करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
जिल्हा वाहतूक नियंत्रण परिवहन सोलापूर,परिवहन अधिकारी मोहोळ यांना निवेदन दिले होते. दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत.जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर व इतर गावांना शिक्षण घेण्यासाठी वेळेत जावे लागत असते यातच मुक्काम एसटी गाड्या बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे व आर्थिक फटका पालकांना सहन करावा लागत आहे.खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात दर आकारून विद्यार्थ्यांचे व पालकांची पिळवणूक करत आहेत.पूर्वीच्या नियमाप्रमाणे एसटी गाड्या दिवसभरातील व मुक्कामी गाड्या सुरू करणार असल्याचे लेखी पत्र प्रभाकर देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर(भैया)देशमुख,जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे,चंदू निकम,प्रशांत पाटील,युवक अध्यक्ष सुहास चव्हाण,गणेश डोंगरे,उपाध्यक्ष नागेश कोकरे,शिवाजी जाधव, शिवशाहू ढवळे,सूर्यकांत माळी,दादा भिसे,दादा चटके,बिरूदेव वाघमोडे,आप्पा हांडे,जगन्नाथ माळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment