सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा...!

सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा...!

जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्याहस्ते राष्ट्रवादीच्या ध्वजाला मानवंदना

                सांगोला (कटुसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 23 वा वर्धापन दिन शुक्रवार दि. 10 रोजी राज्यभर मोठ्या दिमाखात साजरा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला शहर व तालुका यांच्या वतीने सांगोला येथील राष्ट्रवादी भवन तथा आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ध्वजाला मानवंदना देऊन तसेच सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या ध्वजाला मानवंदना करण्यात आली.

                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य बाबुरावजी गायकवाड, तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, चंद्रकांत शिंदे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, शिवाजी नाना बनकर, विजय राऊत, सोमनाथ लोखंडे, सतीश सावंत, जुबेर मुजावर, सुभाष लऊळकर,  सतीश काशीद, राम बाबर, रामचंद्र मिसाळ, राज मिसाळ, सरपंच चंद्रकांत कारंडे, कैलास खबाले बाबुराव नागणे, विनोद रणदिवे, दिलीप मोटे, शिवाजीराव कोळेकर, असलम पटेल, संभाजी हरिहर, अनिल जगदाळे, शिवानंद पाटील, कुलभूषण देशमुख, गिरीश गायकवाड, नारायण माळी, विजय पवार, शिवाजी इंगोले, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, रामदास काळे, विनायक मिसाळ, महादेव पवार, राजाराम वलेकर, सुभाष काटे, दगडू खुळे, वस्ताद बंडगर, मच्छिंद्र खांडेकर, नामदेव खांडेकर, दत्तात्रय घाडगे, श्रीरंग खांडेकर, सुनील गायकवाड, राहुल दोडके, सुनील पाटील, भिकाजी बाबर, ज्ञानेश्वर बाबर, सूर्यकांत आदाटे, नागेश रायचुरे, बसवेश्वर आदाटे, गणेश कोळेकर, वसंत करांडे, शहाजी हातेकर, नाथबाबा चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, हिंदुराव घाडगे, श्यामराव बजबळकर, प्रवीण पाटील, विकास गळवे, सुरेश काटे, आदींसह महिला तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, शहराध्यक्षा शुभांगी पाटील, चैत्रजा बनकर, संगीता पाखरे, शकुंतला खडतरे, जयश्री पाटील, जयश्री सावंत, हिरकणी पाटील, रोहिणी शेंडगे, मंगल खाडे आदिंसह पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 23 व्या वर्धापन दिनानिमित्त दि 10 जून ते १६ जून दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत याची काल शुक्रवार दि 10 पासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी भवन येथील ध्वजवंदन नंतर सांगोला शहरातील ग्रामीण रुग्णालय येथील सर्व रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फळे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांच्यासह ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages