सोहम तळेकर व ओंकार वाघमोडे यांचे 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 11, 2022

सोहम तळेकर व ओंकार वाघमोडे यांचे 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश

सोहम तळेकर व ओंकार वाघमोडे यांचे 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश

              माढा (कटूसत्य वृत्त):- पुणे बोर्डाच्या वतीने मार्च-2022 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी च्या परीक्षेत मोहोळ तालुक्यातील देवडी येथील सोहम शिवाजी तळेकर याने 88.33 टक्के गुण तर माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील ओंकार अनिल वाघमोडे याने 87 टक्के गुण प्राप्त करीत दोघांनीही विज्ञान शाखेतून उज्ज्वल यश संपादित केले आहे.यापूर्वीही या दोघांनी 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 95 टक्केच्या आसपास गुण मिळविले होते.

              सोहम तळेकर याने 600 पैकी 533 गुण प्राप्त केले आहेत.त्याने बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले आहे.त्याचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय देवडी येथे झाले आहे.तो मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांचा मुलगा आहे. ओंकार वाघमोडे याने 600 पैकी 522 गुण प्राप्त केले आहेत. त्याने सोलापूर येथील दयानंद कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले असून त्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.त्याचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल उपळाई खुर्द येथे झाले आहे.तो लिपिक अनिल वाघमोडे यांचा मुलगा आहे.यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

              त्यांचे अभिनंदन प्रभारी गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, विस्ताराधिकारी विकास यादव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages