भाच्याचा कायमचा ताबा मिळण्यासाठी डॉक्टर मामाची कौटुंबिक न्यायालयात धाव- अँड. कटकुर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 11, 2022

भाच्याचा कायमचा ताबा मिळण्यासाठी डॉक्टर मामाची कौटुंबिक न्यायालयात धाव- अँड. कटकुर

भाच्याचा कायमचा ताबा मिळण्यासाठी डॉक्टर मामाची कौटुंबिक न्यायालयात धाव-  अँड. कटकुर

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सख्ख्या बहिणीचा मुलाचा म्हणजेच भाचा कु. संकेत वय 13 वर्ष याचा कायमचा ताबा आपल्याकडे मिळण्यासाठी बहिणीचा भाऊ मामा डॉ. पी.  श्रीकांत  यांनी खुद्द  मेहरबान. कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.

              या केसची  सविस्तर हकीकत अशी की, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मामा डॉक्टर पी. श्रीकांत वय 35 वर्षे , धंदा -डॉक्टर , राहणार कर्णिक नगर,  सोलापूर यांनी त्यांची सख्खी बहीण श्रीमती सपना वय 24 वर्षे राहणार गांधी नगर ,अक्कलकोट रोड,  सोलापूर यांचे विरूध्द खटला दाखल केला. यात बहिण सपना यांचे सतरा वर्षांपूर्वी  श्री. रमेश रा. गांधी नगर, सोलापुर यांच्या सोबत सतरा वर्षापुर्वी लग्न झाले होते व सदर लग्न संबंधातून चि.  संकेत वय तेरा वर्षे हा मुलगा झाला होता व चि. संकेत हा  लहानपणापासून मामा डॉक्टर. श्रीकांत  यांच्याकडेच राहत होता व सन 2016 मध्ये बहिणीच्या पती रमेश यांचे  अकस्मात निधन झाले होते व तद्नंतर मे 2022 मध्ये बहीण श्रीमती सपना ही ति-हाईत व्यव्तीशी  पुनर्विवाह करून निघून गेली व स्वतंत्र जीवन जगत होती,  त्यामुळे अज्ञान मुलगा चि. संकेत यांचे  पितृछत्र व मातृछत्र  हरविल्यामुळे तो अनाथ झाला होता . व चि. संकेत हा पूर्वीपासूनच मामाकडे राहत असल्यामुळे सर्वांचे त्याच्यावर प्रेम होते व मामा डाँ. श्रीकांत यांची  आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे भाचा चि.  संकेत यांचे चांगल्या प्रकारे पालन-पोषण, संगोपन व चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याची आर्थिक ऐपत डाँ. मामाची होती व भाचा संकेत यांचे सुद्धा मामा वर प्रेम होता व त्यांची  सुद्धा मामा कडे कायमचे राहण्याची तयारी होती व तसेच बहिणीही पुनर्विवाह केल्यामुळे त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होणार होते व त्याच्यावर चांगले संस्कार व वळण होणार नव्हते म्हणून मामा डॉक्टर . श्रीकांत हे  सोलापुरातील नामवंत विधिज्ञ अँड.  श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान.  कौटुंबिक न्यायालयात हिंदू गार्डियन अंँड वॉर्डस अँक्ट 1890 कलम 8 अन्वये अज्ञान मुलगा भाचा कु. संकेत याचा कायमचा ताबा मिळणे करिता व तसेच कलम 17 अन्वये अज्ञान मुलगा कु. संकेत यांचे गार्डियन म्हणून नेमणूक होणे करिता मेहरबान. कौटुंबिक न्यायालयात बहीण सपना यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली व याकामी मे.कौटुंबिक न्यायालयाने अज्ञान मुलाची आई सपना यांनी म्हणणे  मांडण्यासाठी व सुनावणीसाठी नोटीस जारी करण्यात आला. याकामी  मामा डाँ. पी.श्रीकांत यांच्यातर्फे अँड. श्रीनिवास कटकुर,  अँड. किरण कटकुर, अँड.आनंद सागर यांनी काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages