शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात

शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात

              पुणे, (कटुसत्य वृत्त): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे.

              शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थीनींना आरक्षित टक्केवारी प्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

              नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 8 वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना प्रवेशाबाबतचा छापील अर्ज, अटी व शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधाबाबतच्या सविस्तर माहितीसाठी गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरूर यांच्याशी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून संपर्क साधावा. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील.

              शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थीनींना विनामूल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश आदीकरीता विहित रक्कम विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा रूपये 600 इतका निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. जिल्ह्यातील गरजू व गरीब विद्यार्थीनींनी वसतिगृह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गृहपाल श्रीमती आर. व्ही. साखरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages