भाजपा आमदार आशिष शेलार कृपाशंकर सिंग शिवसेना आमदारांच्या भेटीला ?

मुंबई, (नासिकेत पानसरे):- भाजपा आमदार आशिष शेलार आणि कृपाशंकर सिंग शिवसेना आमदार वास्तव्यास असलेल्या ट्रायडेंट हॉटेल मध्ये दिसल्यावरून तर्कवितर्कांना उधान आले आहे.एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपाशंकर सिंह वारंवार ट्रायडेंटमध्ये दिसले आहेत. रुफ टॉपवर कार्यक्रमा दरम्यान ते कोणत्या आमदारास भेटले? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
शिवसेनेला समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना आणि अपक्ष आमदार मुक्कामी असताना भाजपच्या नेत्यांनी ट्रायडेंटमध्ये येण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र कोण कुणाच्या सोबत आहेत निवडणुकी नंतरच कळेल.
कृपाशंकर सिंह यांना विचारले असता, मी एका फंक्शनसाठी आलेलो आहे. शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी नाही. योगायोगाने आमदार जर भेटले तर त्यांना नमस्कार करेन आणि सांगेल आमचे उमेदवार धनंजय महाडिकां यांना मतदान करा, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचं आमदारांसोबत बैठक सत्र सुरूच
मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत बैठकसत्र सुरूच ठेवले आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना आज आपल्या विभागातील कामांची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. यात किशोर जोरगेवार, आशिष जयस्वाल, चंद्रकात पाटील, विनोद निकोले यांना बोलावण्यात आलं होतं अशी माहिती समोर आला आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत, महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान करणार आहे. अपक्ष आमदारांची किंमत आता वाढली आहे. पण आमची कामे व्हावी ही आमची अपेक्षा आहे, तसेच आज संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार आहे, अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.
देशमुख, मलिकांचे मतांचे काय होणार आघाडी हायकोर्टात
अटीतटीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते कमी होत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना उद्या होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानची परवानगी ईडी कोर्टाने नाकारली आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.मात्र ईडीच्या या निर्णयावरल महाविकास आघाडीने हायकोर्टात धाव घेतली असून उद्या १२ वाजेपर्यंत निकाल दिला जाणार आहे. मलिक आणि देशमुखांवर टेरर फंडिग सारखे गंभीर आरोप असताना, त्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळू नये अशी भूमिका ईडीने घेतली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय घेत, या दोघांनाही परवानगी नाकराली आहे.या विरोधात महाविकास आघाडी सरकारने हायकोर्टात धाव घेतली आहे.
No comments:
Post a Comment