महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे अभिनंदन
.jpg)
पिंपरी (कटुसत्य वृत्त): दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक गुंतवणूक परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नाने 50 हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात झाली. त्यामुळे महाराष्ट्रात तीस हजार लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागामार्फत महावितरण, महापारेषण व ऊर्जा निर्मिती या तिन्ही कंपन्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी १८ जून रोजी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाच्या या दोन्ही उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे यांनी मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन अभिनंदन केले यावेळी भोलेनाथ मुने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment