महाज्योतीतर्फे आज ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

महाज्योतीतर्फे आज ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग

महाज्योतीतर्फे आज ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग

हुतात्मा स्मृती मंदिरात निशुल्क प्रवेश
24 प्रयोगाची यशस्वी वाटचाल
रंगमंचावरील पहिले राजकीय नाटक

            सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- येथील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये उद्या (दि.2 जून) सायंकाळी 6 वाजता महात्मा ज्योतिबा फुले लिखीत ‘तृतीय रत्न’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन महाज्योतीतर्फे करण्यात आले. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे.

            महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. सोलापुरात होणारा हा 24 वा प्रयोग असणार आहे.

            या नाटकाचे दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर यांनी केले असून क्रिएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. या नाटकात एकूण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात तेवीस प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तृतीय रत्न नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages