भेंड सोसायटी वर बबनराव शिंदे गटाची एकहाती सत्ता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

भेंड सोसायटी वर बबनराव शिंदे गटाची एकहाती सत्ता

भेंड सोसायटी वर बबनराव शिंदे गटाची एकहाती सत्ता

गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा

             लऊळ(कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील भेंड विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर आमदार बबनराव शिंदे गटाने एकहाती सत्ता खेचून आणत विजयी जल्लोष साजरा केला. गटाचे नेतृत्व मच्छिंद्र सुखदेव दळवी,रघुनाथ दळवी साहेब व पंचायत समिती सदस्य डॉ. प्रदिपसिंह पाटील यांनी केले.

             अत्यंय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.नागनाथ संपत्ती दळवी,अजित भिमराव परबत, पुरुषोत्तम सर्जेराव पाटील, चंद्रकांत श्रीपती परबत,बाळू विठोबा बरडे,जोतीराम दत्तु मोरे,रज्जाक हुसेन मुलाणी,बिभिषण हणुमंत सावंत,जगन्नाथ महादेव माळी,सुरेश शंकर लोखंडे,गंगाधर हुलगन्ना साळुंखे,विजया नारायण दळवी,छाया पोपट सावंत यांनी विजय खेचून आणला.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले. 

हा तर कामाचा विजय

             आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य डॉ. प्रदीप पाटील व आम्ही सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने भेंड गावात काम करत असून प्रत्येक गावकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळेच मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व उमेदवार विजयी केले असून सभासदांच्या विश्वासास पात्र राहून या पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू असा विश्वास रघुनाथ दळवी यानी व्यक्त केला .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages