सर्वसामान्यांमध्ये आंबेडकरी विचार चळवळ रुजवली - तुषार ठोंबरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजातील बुद्धिजीवी वर्गाने एकत्रित येऊन सर्वसामान्यांमध्ये आंबेडकरी विचार चळवळ रुजवली पाहिजे, असे विचार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.प्रा. एम. आर. कांबळे व प्रा. डॉ.एम. डी. शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड होते. यावेळी सुधीर चंदनशिवे, प्रा.तेजस्विनी कांबळे, सुरेशदादा गायकवाड, प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य शंकर खळसोडे, सुधीर चंदनशिवे, प्राचार्य उत्तमराव क्षिरसागर, सारंगपाणी रणदिवे, दत्ता थोरे, सुजित हावळे,योगीराज वाघमारे, सुबोध वाघमोडे,शांतीकुमार कांबळे, अॅड. रा. गो.म्हेत्रे, प्रा. अंजना गायकवाड, प्रा. डॉ. वनिता चंदनशिवे, सुनीता गायकवाड,बाली मंडेपू आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment