पक्षाच्या मजबुतीसाठी एकाच ठिकाणी सर्वांचे प्रवेश कार्यक्रम पार पाड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या नेतेमंडळींसाठी स्वतंत्र तीन प्रवेश कार्यक्रम घेण्याची गरज काय, पक्षाच्या मजबुतीसाठी एकाच ठिकाणी सर्वांचे प्रवेश कार्यक्रम पार पाडा आणि पक्षाची ताकद दाखवा,अन्यथा प्रवेशासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्यास पक्षात मतभेद आणि मनभेद असल्याचा मेसेज जाईल, असे मत काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी व्यक्त केले आहे.शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले महेश कोठे, एमआयएममधून आलेले तोफिक शेख आणि वंचितचे आनंद चंदनशिवे यांच्या आणि त्यांच्या समर्थकांसाठी स्वतंत्र तीन प्रवेशाचे कार्यक्रम होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिल्यानंतर यावर पक्षातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर खरटमल यांनी भाष्य केले.
No comments:
Post a Comment