शहरातील प्रमुख मार्गावरील दुकान, शाळा, दुकाने जमीनदोस्त होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

शहरातील प्रमुख मार्गावरील दुकान, शाळा, दुकाने जमीनदोस्त होणार

शहरातील प्रमुख मार्गावरील दुकान, शाळा, दुकाने जमीनदोस्त होणार

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उड्डाणपुलामुळे शहराचे रुपडे बदलणार आहे. यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरील दुकान, शाळा, दुकाने जमीनदोस्त होणार आहेत. यात सोलापूर एसटी स्थानकाची मुख्य इमारतही बाधित होईल, असे सांगण्यात येत आहे. जर स्थानक बाधित झाल्यास ते एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहाच्या इमारतींच्या जागी होण्याची शक्यता आहे. सोलापूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने जुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौक या उड्डाणपुलाच्या भूसंपादनात बाधित होणाऱ्या इमारतींचे मूल्यांकन काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे.यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटर जास्त प्रवास करावा लागणार आहे.या भूसंपादनात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रमुख हॉटेल्स सह एसटी बसस्थानक बाधित होईल, असे सांगण्यात आले आहे. पण याबाबत अद्याप एसटी विभागाला कागदोपत्री सोलापूर : उड्डाणपूलामुळे शहराचे रुपडे बदलणार आहे. यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरील दुकान, शाळा, दुकाने जमीनदोस्त होणार आहेत. यात सोलापूर एसटी स्थानकाची मुख्य इमारतही बाधित होईल, असे सांगण्यात येत आहे. जर स्थानक बाधित झाल्यास ते एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहाच्या इमारतींच्या जागी होण्याची शक्यता आहे.सोलापूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने जुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौक या उड्डाणपुलाच्या भूसंपादनात बाधित होणाऱ्या इमारतींचे मूल्यांकन काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे.  यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटर जास्त प्रवास करावा लागणार आहे. या भूसंपादनात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रमुख हॉटेल्स सह एसटी बसस्थानक बाधित होईल, असे सांगण्यात आले आहे. पण याबाबत अद्याप एसटी विभागाला कागदोपत्री पण मुख्य इमारत बाधित होण्याची शक्यता नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages