दोन वर्षांपासून त्यांना मानधनच न मिळाल्याने कीर्तन बंद; दारूबंदी सरकारला परवडणार नाही
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बाबांनो दारू लई वाईट.. संसाराचं वाटोळं होईल.. बाईला कशाला त्रास देता.. दारूपासून दूर रहा,असा उपदेश करीत अनेक कीर्तनकारांनी गावोगावी जाऊन प्रबोधन केले. मात्र, साधारण दोन वर्षांपासून त्यांना मानधनच न मिळाल्याने कीर्तन बंद आहे. परिणामी मागील वर्षात दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दारू हे फार मोठे उत्पन्नाचे साधन आहे, म्हणून दारूबंदी सरकारला परवडणार नाही. त्यामुळे दारूबंदीचा निर्णय होत नाही.मागील काही वर्षांत ग्रामीण भागात दारूबंदीसाठी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.आज दारूमुळे स्त्रियांच्या दुःखाला अंत नाही. दारू पिण्याविरुद्ध स्त्रीशक्ती जागृत करणे, दारूड्या नवऱ्यापासून स्त्रीचे व कुटुंबाचे संरक्षण करणे ही शक्य गोष्ट आहे. त्यामुळे कीर्तनातून दारूबंदीवर प्रबोधन करण्यात आले. मात्र,त्यांना मानधनच न मिळाल्याने घसा कोरडाकरून काय उपयोग झाला, दोन वर्षे लोटले, कोरोना काळात मदत मिळाली नाही. आता आणखी किती दिवस अंत पाहणार, अशी विचारणा कीर्तनकारांचे होत आहे.
No comments:
Post a Comment