१२ वीनंतर आता १० वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; कधी लागेल निकाल? समोर आली माहिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

१२ वीनंतर आता १० वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; कधी लागेल निकाल? समोर आली माहिती

१२ वीनंतर आता १० वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; कधी लागेल निकाल? समोर आली माहिती

            मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल नव्वद टक्क्यांच्या वर लागला.निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्यावर घेऊन मिळाले. मात्र आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. बारावीचा निकाल तर लागला तर पण आता दहावीचा निकालही याच महिन्यात लागणार अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे.मात्र निकालाचं कुतूहलही आहे. लवकरच अपलोडींगचं काम होईल सुरु महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे.महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते. त्यानंतर निकाल ऑनलाइन अपलोड केला जाईल. 'या' वेबसाईट्सवर बघता येईल निकाल 1. mahresult.nic.in 2. maharashtraeducation.com 3. mahahsscboard.maharashtra.gov.in.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages