बेंबळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सौ. राजश्री भोसले विजयी, सौ. रेश्मा हुंबे यांचा दारुण पराभव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

बेंबळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सौ. राजश्री भोसले विजयी, सौ. रेश्मा हुंबे यांचा दारुण पराभव

बेंबळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सौ. राजश्री भोसले विजयी, सौ. रेश्मा हुंबे यांचा दारुण पराभव

               बेंबळे (कटुसत्य वृत्त): सविस्तर वृत्तांत असा की संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेंबळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत शिवशंभो ग्राम विकास आघाडीतर्फे राजश्री समाधान भोसले, विमलेश्वर -सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीतर्फे रेश्मा सागर हुंबे तर बनेश्वर ग्राम विकास आघाडीतर्फे सोनाली गौतम काळे या तीन महिला निवडणूक रिंगणात होत्या. रविवार  दिनांक 5 जुन रोजी झालेल्या मतदानामध्ये 1105 मतदारांपैकी 924 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी माढा येथे झालेल्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे :-

  • राजश्री समाधान भोसले - 453
  • रेश्मा सागर हुंबे - 364
  • सोनाली गौतम काळे - 105

               राजश्री समाधान भोसले यांना रेश्मा सागर हुंबे यांच्यापेक्षा 89 मते जास्त मिळाली व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बेंबळे विभागाचे  सर्कल अधिकारी सोनवणे यांनी काम पाहिले त्यांना तलाठी नरळे यांनी सहकार्य केले.

               या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व या गावचे माजी उपसरपंच विष्णुपंत हुंबे व माजी सरपंच स्वर्गीय भागवत आप्पा भोसले यांचे सुपुत्र समाधान भोसले या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती परंतु मतदारांनी आपला कल शांत ,संयमी आणि प्रतिष्ठित असलेल्या समाधान भोसले यांच्या बाजूने दिला असून राजश्री भोसले या 89 मतांनी विजयी झाल्या आहेत.

               कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे यांच्या सुनबाईंच्या विजयासाठी अनेकजणांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही हे विशेष होय.  या निवडणुकीमध्ये समाधान भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले माजी सरपंच कैलास भोसले माजी सोसायटीचे चेअरमन दादा मालक भगत, पोपट अनपट, रत्नाकर कुलकर्णी विजय पवार ,राजेंद्र जगताप ,औदुंबर लोंढे, बबलू काळे, राहुल कुलकर्णी गोरख अनपट दीपक किर्ते दादा भोसले व इतर अनेक ज्ञात-अज्ञात प्रतिष्ठित मान्यवरांनी आपले प्रयत्न पणाला लावले व राजश्री भोसले यांना विजयी केले आहे हे विशेष होय. या निवडणुकीत तिसर्या उमेदवार सोनाली काळे यांना मिळालेली 105 मध्ये निर्णायक ठरली आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विजयी झालेल्या राजश्री भोसले यांचे प्रतिनिधी समाधान भोसले व पराभूत झालेल्या रेश्मा हुंबे यांचे सासरे विष्णुपंत हुंबे हे दोघेही आमदार बबनराव शिंदे यांना मानणारे ,एकनिष्ठ व जवळचे आहेत . या निवडणुकीमध्ये विष्णू हुंबे यांनी सर्वच बाबतीत केलेला अतिरेक  नडला असून मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दीलेली आहे हे मात्र निश्चित.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages