टेंभूर्णी - बेंबळे रस्त्याचा कामाचा बट्ट्याबोळ...

ठेकेदार व अधिकाऱ्यांचा संगनमताने मोठा भ्रष्टाचार
बेंबळे (कटुसत्य वृत्त): वृत्तांत असा की टेंभुर्णी- बेंबळे या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामास 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती ते काम 2022 च्या पावसाळ्यापूर्वी करणे बंधनकारक असताना 22 चा पावसाळा संपताच करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु नंतरही काम सुरू केलं नाही कारण ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी होते असे सांगून काम सुरु केले नाही., गळीत हंगामाची सांगता झाल्यावर हे काम होईल असे सांगितले. गळीत हंगाम आटोक्यात येताच रस्त्याचे काम सुरु केले परंतु विभागून काम करण्यात आले व तेही निकृष्ट व अपुरेच आहे. रस्त्याच्या कामात खडीचा थर कमी केलेला आहे, डांबर ऐवजी डांबरात काळे घाण तेलाचे मिश्रण करून ते वापरण्यात आले आहे , वरून नीट चोप सुद्धा दिलेला नाही व तेही आता झालेले काम उचकटून जाऊ लागले आहे. यावर आणखीन एक थर देण्यात येईल असे फक्त सांगण्यात येते पण अद्याप काहीच केलेले नाही. साईड पट्यावर मोठमोठे दगड व माती आणून ठेवले आहेत., काही ठिकाणी ट्रॅक्टरने मुरुम पसरला आहे पण चोपलेले नसल्यामुळे वाहनांचे अतिशय हाल होत आहेत. या कामात ठेकेदार लोंढे अधिकारी हेडगिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून निपक्षपातीपणे व भ्रष्टाचारविरहित चौकशी व्हावी व चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे .या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रेलर चार चाकी व दोन चाकी वाहने यांची सतत ये-जा चालू असते. अनेक वर्षापासून या रस्त्याची अशीच दुरावस्था झाली आहे ,त्याला निधी मंजूर झाला पण ...दैव देते पण कर्म नेते.. याप्रमाणे ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी निकृष्ट काम सुरु करून निधी हडप केला व मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे समजून येत आहे. हे अपुरे काम तातडीने सुरू होऊन जर चांगल्या पद्धतीने नाही करण्यात आले तर आता नागरिकांची सहनशीलता संपली असून, कार्यालयापुढे आंदोलन उपोषण व संतप्त इतर काही मार्गाचा अवलंब करण्यास नागरिक मागे पुढे पाहणार नाहीत. या रस्त्यावरून घोटी, बेंबळे ,काळे वस्ती, भोसलेवाडी, हरी नगर, माळेगाव, मिटकलवाडी तसेच कान्हापुरी वाफेगाव परिसरातून नागरिकांची व वाहनांची ये-जा सतत चालू असते. रस्त्याच्या या अवस्थेमुळे या परिसरामध्ये सर्वात जास्त मणक्याचे पेशंट आहेत तसेच गरोदर स्त्रिया, लहान मुले किंवा गरोदर स्त्रीला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्यास या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड कठीण झाले आहे. यासाठी तातडीने लक्ष देणे व रस्ता करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment