रशियन इलिझारोव्ह शस्त्रक्रियेनंतर रुग्ण तीन तासात चालू लागला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 15, 2022

रशियन इलिझारोव्ह शस्त्रक्रियेनंतर रुग्ण तीन तासात चालू लागला

 रशियन इलिझारोव्ह शस्त्रक्रियेनंतर रुग्ण तीन तासात चालू लागला

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  आठ दिवसापूर्वी ट्रक वरून पडून डाव्या पायाच्या गुडघ्याच्या नडगीचे हाड तुटल्यामुळे एक चाळीस वर्षाचा रुग्ण आडके हॉस्पिटल, सोलापूर येथे आला होता. त्यास रशियन इलिझारोव्ह पद्धतीने सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोग व इलीझारोव्हतज्ञ डॉ.संदीप आडके यांनी फ्रॅक्चर न उघडताच, बिन टाक्याची रशियन पद्धतीने शस्त्रक्रिया केली व शस्त्रक्रिया संपल्यानंतर तीन तासानंतर भुल उतरल्यानंतर शस्त्रक्रिया केलेल्या पायावर वाकरच्यासाह्याने त्या रुग्णास चालते केले.आपला शस्त्रक्रिया झालेला हात किंवा पाय रुग्ण तीन तासांमध्ये वापरू शकतो ही वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीच आहे आणि अशा गोष्टी सोलापुरात घडतात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आह. हे केवळ शक्य झाले आहे जगातील अतिप्रगत रशियन इलिझारोव्ह पद्धतीमुळे.
१९५१ साली रशियातील कुरुगान या शहरात डॉ. गॅब्रियल इलिझारोव्ह यांनी या अस्थीरोगावरील अतिशय वेगळ्या पद्धतीचा शोध लावला व आज ही जगातील अस्थीरोगांवरील अत्याधुनिक पद्धत गणली जाते. यामध्ये चिरफाड न करता शरीराच्या बाहेरुनच बारीक तारा व रिंगांची फ्रेम बसवली जाते, त्यामुळे शरीरावर चिरफाड केल्याचे व्रण रहात नाहीत. रुग्णाला लगेच आपला शस्त्रक्रिया केलेला हात किंवा पाय वापरता येतो त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस रहायची गरज लागत नाही , महागडी औषधे घ्यावी लागत नाहीत व पर्यायाने खर्च कमी येतो. या पद्धतीमध्ये अत्यंत खात्रीपूर्वक हाडांच्या रोगांवरील कोणत्याही रुग्णांवर उपचार शक्य झाले आहे. शरीरातील सर्व प्रकारची फ्रॅक्चर, न जुळलेली हाडे, पूर्वीच्या यशस्वी शस्त्रक्रिया, हाडातून पु येणे, पोलिओ, हाडांचा वाकडेपणा सरळ करणे, गुडघेदुखी, लहान मुलांचे सर्व अस्थीविकार, उंची वाढवणे, मणक्यांचे आजार अशा जवळपास ८०टक्के असाध्य रुग्णांवर  ही शस्त्रक्रिया लागू पडते. विशेष म्हणजे रुग्णाला लवकर चालते केल्यामुळे मानसिक दृष्ट्या रुग्णाला आत्मविश्वास येऊन तो आपली नित्याची कामे कोणावरही अवलंबून न राहता करू शकतो, तसेच हाता- पायाचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे  इजा झालेली हाडे व स्नायु लवकर जुळतात. सांधे आखडत नाहीत. तसेच इतर पोटाचे व श्वसनाचे विकार बळावत नाहीत.
१५जून १९२१ रोजी डॉ. गेब्रियल इलिझारोव्ह यांचा जन्म झाला व त्यानिमित्त २०१६ सालापासून डॉ. आडकेंनी त्या दिवसाला 'जागतिक इलिझारोव्ह दिवस' म्हणून सर्व जगात प्रचलित केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages