गणेश पाणीपुरवठा मार्फत बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 15, 2022

गणेश पाणीपुरवठा मार्फत बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 गणेश पाणीपुरवठा मार्फत बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य ठेवून आपल्या आयु ष्य मध्ये येणाऱ्या अडचणी ला ढाल बनवून तुम्ही पुढे यावे असे मत गणेश सहकारी पाणीपुरवठ्याचे चेअरमन तसेच कण्हेरगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन  लिंबाजी मोरे यांनी व्यक्त केले. गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्था ने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  किसन  खोचरे गणेश पाणीपुरवठ्याचे संचालक सतीश काशीद किरण खोचरे बापू जाधव कन्हेरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन उमेश डोके  संचालक दत्तात्रय डोके मारुती काशीद विशाल भरंगडे रतिलाल केदार प्राध्यापक पाटील सर संस्थेचे सचिव शंकर गोसावी व सभासद वर्ग उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांची प्रतिकूल परिस्थिती आहे अशा विद्यार्थ्यांना  गणेश पाणी पुरवठा या संस्थेच्य  माध्यमातून पाच लाख रुपये एफ डी करून येणाऱ्या व्याजाची रक्क्म गुणवंताना बक्षीस स्वरूपात देण्याचे मोरे साहेबांनी जाहीर केले.. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा असा सल्ला दिला. व सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी बारावी मध्ये गुणवत्ता गुणवत्ता प्राप्त झालेले कु. शुभांगी महादेव मोरे   कु. सोनिका पोपट  तळेकर कु. पर्वणी सुभाष गिरी कु. स्वप्नाली बाळासो लोंढे कु. प्रीती प्रभाकर डोके व आतिश डोके या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी प्राध्यापक  एच. पी. पाटील सर यांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन घर दरवर्षी पाच गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपये देण्याचे घोषित केले तर निवृत्त पोलिस निरीक्षक किसन खोचरे यांनी कु. पर्वणी गिरी या विद्यार्थ्यांनी रोख रक्कम देऊन पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे घोषित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले तर रतिलाल केदार यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages