दारु पिऊन एसटी चालवणारे नकोच! एसटी चालकाची होणार ब्रेथ एनालायझर टेस्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 15, 2022

दारु पिऊन एसटी चालवणारे नकोच! एसटी चालकाची होणार ब्रेथ एनालायझर टेस्ट

 दारु पिऊन एसटी चालवणारे नकोच! एसटी चालकाची होणार ब्रेथ एनालायझर टेस्ट

मुंबई (कटूसत्य वृत्त):- एसटीचा स्लिपर कोच कोसळून 15 प्रवाशी नुकतेच जखमी झाले होते. अपघातग्रस्त चालकाने मद्यप्राशन केले होते अशी माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे आता ड्रायव्हरची ब्रेथ अॅनालायझरने टेस्ट करून खातरजमा झाल्यानंतरच त्यांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग देण्यात येणार आहे.27 मे रोजी मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने पालघर येथे एसटीचा स्लिपरकोच कोसळून पंधरा प्रवाशी जखमी झाले होते. त्यामुळे प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रकाने आता कामगिरीवर जाणाऱ्या चालक आणि वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे आदेशच महामंडळाने काढले आहेत.

वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे आदेशच महामंडळाने काढले आहेत.एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक, वाहन परिक्षक यांनी तातडीने स्थानक, आगार प्रमुख यांना त्याची माहिती ताबडतोब द्यावी. त्यानंतर त्याला कामगिरीवरुन उतरुन घेतील. तसेच त्वरित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात येऊन खातेंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

रातराणीच्या ड्रायव्हरची तपासणी

ज्या आगारात अल्कोहोल टेस्ट मशीन उपलब्ध आहे त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगारांच्या मार्गस्थ होणाऱ्या बसेसच्या चालकांची प्रामुख्याने लांब पल्ला रातराणी बसेसची तपासणी करावी व त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवावी असे आदेशात म्हटले आहे. या मोहिमे दरम्यान अल्कोहोल टेस्ट मशीनद्वारे विभागातील सर्व मार्गतपासणी पथके, वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत तपासणी कार्यक्रम राबविता येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages