पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान

पुणे (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पिठेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी रविवार दिनांक 05/06/2022 रोजी आयोजित करण्यात आले होते. पिठेवाडी गावचे माजी सरपंच पप्पा साहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कुस्त्यांचे आयोजन भैय्यासाहेब बंडगर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी जंगी कुस्त्याचे उद्घाटन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशिल मोहिते पाटील,माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते,पैलवान भैय्यासाहेब बंडगर उपाध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्रीमंत ढोले जी. प.सदस्य पुणे, पैलवान भोजिराज माने,बाजीनाना सरगर, शैलेश जाधव, लक्ष्मण बनपट्टे,तानाजी खराडे, अमर जगदाळे शिवधर्म फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष, दीपक काटे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील,पैलवान दिपेश रणवरे, पांडुरंग सहकारी साखर कारखाना संचालक भास्कर कसगावडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ जानकर इत्यादी उपस्थित होते.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी पुणे विरुद्ध असीम कुमार दिल्ली भारत केसरी या जंगी कुस्तीत विजय चौधरी विजयी ठरले. तर पैलवान माऊली कोकाटे उप महाराष्ट्र केसरी सराठी विरुद्ध विष्णू खोसे युवा महाराष्ट्र केसरी यांच्या सामन्यात माऊली कोकाटे यांनी बाजी मारली.तर पै.अनिल कचरे इंदापूर विरुद्ध संतोष गावडे यांच्या कुस्तीत अनिल कचरे विजय ठरले. पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध मनोज माने यांच्या कुस्तीत सतपाल सोनटक्के विजयी ठरले. पै.किरण माने विरुद्ध पै.दीपक मोहिते यांच्या सामन्यात दीपक मोहिते विजयी ठरले.पैलवान विक्रम घोरपडे विरुद्ध पैलवान धनाजी कोळी माळशिरस यांच्या सामन्यात विक्रम घोरपडे विजयी ठरले.पैलवान योगेश कांबळे विरुद्ध पैलवान नितीन लोखंडे भवानी नगर यांच्या सामन्यात योगेश कांबळे विजयी ठरले.
यावेळी राजमाता चांदीची गदा आणि पाच लाख रुपये जंगी कुस्ती विजेते पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आले. सदर कुस्त्यांचे मैदान सकाळी 1ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होते यावेळी 300 मैदानी कुस्त्या पार पडल्या.
No comments:
Post a Comment