माढा नगरपंचायती समोर नारळ फोडून ठेवली अकरा रुपयांची दक्षिणा ,मुतारी ची व्यवस्था व नालेसफाईसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

माढा नगरपंचायती समोर नारळ फोडून ठेवली अकरा रुपयांची दक्षिणा ,मुतारी ची व्यवस्था व नालेसफाईसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची चर्चा

माढा नगरपंचायती समोर नारळ फोडून ठेवली अकरा रुपयांची दक्षिणा, मुतारी ची व्यवस्था व नालेसफाईसाठी शिवसेनेने केलेल्या  आंदोलनाची चर्चा


              माढा (कटूसत्य वृत्त): माढा शहरातील रहदारीच्या भागात सार्वजनीक मुतारीची व्यवस्था करावी. खराब झालेल्या मुतारी  व्यवस्थित कराव्यात.छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नाल्याची सफाई तत्परतेने हाती घेण्यात यावी या मागणीसाठी माढा शहर शिवसेनेने अनोखे आंदोलन करुन नगरपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

              शिवसेना शहराध्यक्ष शंभु साठे यांच्या  नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नगरपंचायत च्या पायरीची पुजा करुन ११ रुपये दक्षणा ठेवत ७ नारळ पायरीवर  फोडुन नगरपंचायत प्रशासनाच्या कारभाराचा घोषणाबाजी करीत धिक्कार केला.

              माढा शहरात  सार्वजनिक ठिकाणी नसलेल्या भागात  मुतारीची व्यवस्थित करावी.मुतारी नसल्याने  सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.तसेच  मुख्य चौकातील नाल्याची सफाई अनेक दिवसांपासून केलेली नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागण्या प्रश्नी सुधारणा न  झाल्यास उग्र स्वरूपाचे  आंदोलन छेडण्याचा इशारा शंभू साठे यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे  यांना दिला आहे. यावेळी आंदोलक  शिवसैनिक उपस्थित होते.आंदोलनावेळी माढा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

              शहरात अनेक ठीकाणी मुतार्याची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र नागरिकांकडून त्याची दुरावस्था करण्यात आलेली आहे.तरीदेखील ज्या ठिकाणी खराब झालेल्या मुतार्या आहेत.त्याची दुरुस्ती करुन घेऊन नाल्याची सफाई करुन  घेऊ - चरण कोल्हे,माढा नगरपंचायत मुख्याधिकारी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages