आर्या पब्लिक स्कूल ची किशोरी खटके ९०.५ टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये द्वितीय

कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय घरी अभ्यास करून मिळवले यश
बेंबळे (कटुसत्य वृत्त): आर्या पब्लिक स्कूल, पिंपळनेरची विद्यार्थीनी किशोरी विकास खटके-पाटील हीने बारावी विज्ञान शाखेत ९०.५ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल तिचे जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे,प्राचार्य रवींद्र लोखंडे,यशराज फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख खटके-पाटील, किसनराव भांगे, किर्तीकुमार भांगे यांनी अभिनंदन केले. किशोरी खटके ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातील असून तीने कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लास न लावता फक्त शाळेतील शिक्षण व स्वतः अभ्यासाची तयारी करून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
No comments:
Post a Comment