१२ वीत जय तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

९७.५८% निकलाने शाळेत आनंदाला उधाण
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- इयत्ता बारावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चा १२वी चा निकाल ९७.५८ टक्के लागला असून संपूर्ण शाळेत विद्यार्थ्यात आणि पालकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जवळपास शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणाऱ्या आश्रम शाळेकडे गुणवत्तेची हमी असणारे केंद्र म्हणून पालकांकडून पाहिले जात असल्याची चर्चा टेंभुर्णी शहरात सुरु आहे.
प्रशालेचा शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे :-
विज्ञान शाखा :- ९८.२१%
- कु. अनपट भाग्यश्री शशिकांत (८७.६७)
- कु. लवंगारे प्रज्ञा पोपट (८५.००)
- कु. कुटे ऋतुजा अरुण (८३.००)
कला शाखा :- ९७.०५%
- कु. श्रीखंडे धनश्री शहाजी (७६.३३)
- कु. श्रीखंडे अमृता अनिल (७५.८३)
- कु. पवार अनिता यल्लप्पा (७०.३३)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष कैलास सातपुते सर प्राचार्या जयश्री गवळी मॅडम संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी अगावणे मॅडम यांनी मनापासून अभिनंदन व्यक्त केले आहे.
कॉलेजच्या सर्व शिक्षक स्टाफचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण गुणवत्ता देण्यासाठी आश्रम शाळा नेहमीच कटिबद्ध असल्याचे मत अनेक जाणकार पालकांमधून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment