विधान परीषद निवडणुक - भाजपाची यादी जाहिर पंकजा मुंडेंना डावलले
_1654670447910_1654670452320.jpg)
मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यात येत्या २० जून रोजी होत असलेल्या विधानपरीषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या ५ उमेदवारांची यादी जाबिर केली असून भाजपाने घटक पक्षांना संधी दिली नाही तर माजी मंत्री पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही डावलले आहे.तर उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना उमेदवारी दिली नाही. कोणाला उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आम्ही फक्त कोरी पाकीट आहोत पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असतो.असे पाटील म्हणाले.
पंकजा मुंडेचा २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचा पराभव केला. त्यापासून पंकजा यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी समर्थकांतून होऊ आहे.दरम्यान, त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले.परंतु राज्यसभेसाठी डावलण्यात आले. आणि विधान परीषद निवडणुकी पासून दूर ठेवत राज्यातील राजकारणापासून दूर ठेवले जात आहे.
मुंबईतील ओबीसी आरक्षण मोर्चा, औरंगाबाद येथे पाण्यासाठी भाजपने काढलेला जलआक्रोश मोर्चा यापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. यावरून त्यांची काहीशी नाराजी दिसून आली. त्या पक्षाच्या कार्यक्रमा पासूनही अंतर ठेवून आहेत. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यापासून डावलण्यात आल्याने आता पंकजा कोणती भूमिका घेणार हे पहावे लागेल.
No comments:
Post a Comment