शिवस्वराज्य दिन माढा पंचायत समिती मध्ये उत्साहात साजरा



कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- दि.6 जून रोजी "शिवस्वराज्य दिन" माढा पंचायत समिती च्या कार्यालयांमध्ये माढयाचे आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी सर्व पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रथम राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची,स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती,पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन"म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा घेतला आहे.तेव्हा पासून ६ जून या दिवशी सर्व शासकीय कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात राबविला जात आहे.
या कार्यक्रमास आमदार बबनदादा शिंदे,गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील,गट शिक्षणधिकारी बंडू शिंदे,सयाजी बागल,हर्षल बागल,सज्जनराव जाधव,दादासाहेब मराठे,विक्रात खेताडे,रमेश बोराडे, हनुमंत भोसले,राहुल डेंगळे,पांडुरंग हांडे,माधुरी पाटील,सुग्रीव सुर्वे, आनंद साठे आदीअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,कार्यक्रम सूत्रसंचालन सयाजीराव बागल यांनी मानले व आभार महेश शेंडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment