बँक कर्ज मंजुरी पत्रांचे आज वाटप जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांची माहिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

बँक कर्ज मंजुरी पत्रांचे आज वाटप जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांची माहिती

बँक कर्ज मंजुरी पत्रांचे आज वाटप जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांची माहिती

               सोलापूर, (कटुसत्य वृत्त): आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.8 जून) नियोजन भवन येथे बँकर्सचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रातिनिधीक स्वरूपात कर्ज मंजूर पत्रांचे वाटप लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी दिली.

               या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व प्रमुख बँका सामील होणार आहेत. बँकेमध्ये उत्कृष्ठ काम करणारे बँक मित्र, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार जयसिद्धेशवर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages